खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परीवार अभियान उत्साहात

Foto

खुलताबाद, (प्रतिनिधी) ग्रामीण रुग्णालय खुलताबाद अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परीवार अभियान राबवीण्यात आले. अभियान अंतर्गत विविध रोग निदान शिबीर घेण्यात आले यात नेत्रतपासणी, स्क्तदान शिबीर, असंसर्गजन्य आजार तपासणी, बालकांचे लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, क्षयरोग तपासणी किशोरवयीन मुलांची तपासणी व समुपदेशन व आहार विषयक मार्गदर्शन इत्यादी उपक्रम घेण्यात आले. याचा तालुक्याती नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. सदरील कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर व वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, सुरेश मरकड, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, माजी सभापती दिनेश अंभोरे सामाजीक कार्यकर्ते आबेज जाहागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थीती, निवासी वैद्यकीय अधिकारी बडे सर, आस्थीरोगतज्ञ डॉ. सोहेल शेख आणि मुख्य चिकित्सक डॉ. रेशमा शिरीन यांनी मार्गदर्शन केले तसेच ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रफुल्ल गायकवाड सर वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बोधनकर, डॉ. वंदना गायसमुद्रे तसेच डॉ. मयुरी जोशी, दंतशल्यचिकित्सक डॉ. शिंदे सर व इंचार्ज सिस्टर किर्ती पाषाण तसेच ग्रामीण रुग्णालय येथील सर्व अधिपरीचारिका व कर्मचारी वर्ग यांनी उत्साहीपणे अभियान पार पाडले.